• Fri. Sep 25th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

गडचिरोली ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे AICC प्रभारी महाराष्ट्र सृजन संघटन RGPRS विवेक अवस्थाजी तसेच प्रदेश अध्यक्ष RGPRS अविनाशजी उमरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे बैठक पार पडली.

ByAshok Mishra

Sep 25, 2026

बैठकीदरम्यान ग्रामपंचायतींचे बळकटीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार, गावपातळीवरील विकासकामे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी AICC प्रभारी महाराष्ट्र सृजन संघटन RGPRS विवेक अवस्थाजी तसेच प्रदेश अध्यक्ष RGPRS अविनाशजी उमरकर यांनी पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या अधिकारांनुसार प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे आणि गावपातळीवरील प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीस महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित राहून पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणावर भर दिला. ते म्हणाले, “पंचायत राज व्यवस्था ही ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. ही व्यवस्था अधिक पारदर्शक, सक्षम आणि लोकाभिमुख असली पाहिजे. ग्रामसभांचे अधिकार प्रभावीपणे वापरले गेले पाहिजेत. गावांच्या विकासाचे निर्णय घेताना स्थानिक नागरिकांचा सहभाग तसेच त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळाले पाहिजे.”

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करून गावपातळीवर विकासाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर सातत्याने प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सौं.कुसुमताई अलाम, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
————————–
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968