• Fri. Sep 25th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आ. राजेश विटेकर यांना निवेदन;

ByAshok Mishra

Sep 25, 2026

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आ. राजेश विटेकर यांना निवेदन;

“ट्रिगर लागू करून हेक्टरी १ लाख मदत देण्याची मागणी”

 

परभणी/प्रतिनिधी:- रमेश मुलगीर

मानवत तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुरू असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार राजेश दादा विटेकर हे मानवत तालुक्यात दुष्काळ पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी सावळी येथे भेट दिली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून पावसाचा खंड असल्याने मूग, उडीद, सोयाबीन पिके करपून खाक झाली आहेत. कापूस वरून हिरवा दिसत असला तरी आतून नुकसान आहे. हळद व संत्रा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीचा ट्रिगर लागू करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी या सह विविध मागण्या करण्यात आल्या यात प्रामुख्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी १ लाख मदत द्यावी, पिकविम्याच्या ट्रिगर मधील बदल पूर्ववत करून पिकविमा द्यावा, हळद व संत्रा या बागायती पिकांचा पीक विमा द्यावा, थकबाकीदार व चालू खातेदारांची २ लाखांपर्यंत कर्जमाफी करावी, केंद्र सरकारने कापसाला प्रती क्विंटल १२ हजार भाव स्थिर ठेवावा, मानवत तालुक्यातील ४२ गावांच्या सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. यावेळी दुष्काळ पाहणी करत असताना दादांनी आश्वासन दिले की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईल. यावेळी मा. कृ. उ. बा. समिती संचालक अंबादास तुपसमुद्रे, माणिक काळे, बाबासाहेब आवचार,संतोष लाडाने, मा. उपसरपंच गोपाळ काळे, विठ्ठल काळे, पं. स. सदस्य लक्ष्मण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळे, नामदेव काळे, दत्ता काळे, पोलीस पाटील बाळासाहेब काळे, रघुनाथ काळे, भगवान काळे यांच्या सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968