DAMOH ग्राम मगरोन मे अवैध उत्खनन, परिवहन और भंडारण के रोकथाम के तहत हुई कार्रवाईHTA रक्तदान से बड़ा कोई दान नहीं: हटा में 40 लोगों ने किया ब्लड डोनेटदेवगाव ,रंगारी : सहायक फौजदार सलीम शब्बीर शहा यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरून दिनांक 25/9/2026 रोजी रात्रीची गस्त घालत असताना त्यांना 4.30 वाजता मौजे बोरसर येथील शिवना नदीपात्रात एक निळ्या रंगाचे मुंडके असलेल्या सोनालीका कंपनी चा ट्रॅक्टर क्रमांक MH-20-GK-3899 आणि त्याला पाठीमागे जोडलेली लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली जिच्यात एक ब्रास वाळू प्रती 5000 रुपये, आणि ट्रॅक्टर आणि ट्रॉली मिळून 8,05000 असा मिळुन आठ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला .
या ट्रॅक्टर चा ड्राइवर आरोपी नामे रमेश बालचंद देशमुख राहणार बोरसर बुद्रुक तालुका कन्नड जिल्हा छ.संभाजीनगर हा इसम रात्रीच्यावेळी चोरी करण्याचा उद्देशाने शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसून देखील अवैधरीत्या शासनाचा महसूल बुडवून वर लिखित असलेला मुद्देमाल विना परवाना बेकायदेशीर रित्या वाळूची वाळूची चोरटी विक्री करताना आढळून आला म्हणुन त्याच्या वर कलम 303(2)बी.एन.एस. सहकलम गौणखनिज अधिनियम 21 (1),(2)tt,(3),r(4),आणि (5)प्रमाणे गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री खरात बक्कल न. 218 यांनी दाखल केला आहे.
त्याच रात्री
फिर्यादी नारायण मुगाजी भिसे. पोलीस उपनिरीक्षक देवगाव रंगारी यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार ते आपल्या कर्तव्या वर असताना दिनांक 25/9/2026 रोजी रात्री 2.00 वाजता मौजे टाकळी ते ताड़पिंपळगाव कडे जाणार्या रोडवर बोरसर चौफुलीवर एक पिवळ्या रंगाचा हाफ बॉडी असलेला अशोक लेलैंड कंपनी चा ट्रक क्र. MH-20-EG- 3559 असलेला किंमत अंदाजे 4,00000 लाख रुपये त्यामधे एक ब्रास वाळू जिची प्रति ब्रास 5000 हजार रुपये असे मिळून 4,05000, चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
या मध्ये बसलेला ड्राइवर नामे प्रेमदास दामोदर त्रिभुवन राहणार बोरसर तालुका कन्नड याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैधरीत्या शासनाच्या महसूल बुडवून वरील वर्णनाचा मुद्देमाल विना परवाना बेकायदेशीर रित्या वाळूची चोरटी विक्री करताना मिळून आला त्याचेवर कलम 303 (2)बी.एन.एस सह कलम गौणखनिज अधिनियम 21(1),(2),(3),(4),(5)प्रमाणे गुन्हा दाखल केला. असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री सिद्धार्थ गोरे यांच्या आदेशानुसार तपास. अमलदार पोलीस हवालदार बक्कल न. 465 यांच्या कडे तपास कामी दिला आहे.
