• Mon. Sep 28th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

JALNA: जगदीश राठोड

नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे यांचे प्रतिपादन;पोलीस निरिक्षक देशमुखांकडून मंठेकरांचे कौतुक!

डिजेचा दणदणाट नाही,मंठ्यात गणेशोत्सवाची अनोखी ‘एकजुटीची मिरवणूक’; शांतता-शिस्तीने जिंकली सर्वांची मने!

अंकर : मंठा शहरात यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक सलोखा, शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली दक्षता, तसेच उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल नगरपंचायतीच्या वतीने पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख आणि महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


मंठ्याची सामाजिक एकता आणि बंधुभावाची परंपरा कायम असून, यंदाच्या गणेशोत्सवात सर्व समाजातील नागरिकांनी दाखविलेला संयम, शिस्त आणि सहकार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे यांनी केले.
ध्वनी प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक व शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला गणेश मंडळे तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासन, नगरपंचायत, महावितरण, गणेश मंडळे आणि नागरिक यांच्या समन्वयातून संपूर्ण उत्सव शांततेत पार पडला.
‘मंठ्याचा सामाजिक सलोखा वाखाणण्याजोगा’

पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख म्हणाले, “मंठा शहरात सर्व समाजातील बांधव एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ही अभिमानाची बाब आहे. शहरातील सामाजिक एकोपा आणि सलोखा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.” गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले.


नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे म्हणाले, “ध्वनी प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला मंठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाची दक्षता, महावितरण कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि गणेश मंडळे व नागरिकांचा सकारात्मक सहभाग यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोख्याचे उदाहरण ठरला.”
यावेळी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे, नगरसेवक सचिन बोराडे, जे. के. कुरेशी, नगरसेवक राजेश खंदारे, मनोज देशमुख, दीपक बोराडे, उमेद बागवान, बाज पठाण, महावितरणचे यू. व्ही. घनवट, डी. ए. ठोंबे, डी. एस. गादेवाड, के. एम. वाघमारे, एस. एस. केंद्रे, ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी, महादेव पाखरे आदी उपस्थित होते.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968