• Sat. Jun 27th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

गोंदिया ‘पलाश मिनी सरस’च्या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मानले आभार

ByAshok Mishra

Feb 27, 2026

‘पलाश मिनी सरस’च्या यशाबद्दल

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मानले आभार

         गोंदिया, दि.27 :  ‘पलाश मिनी सरस’मध्ये 80 लाखाच्या वर विक्री झाली. जिल्ह्यातील नागरिकांनी या ‘पलाश मिनी सरस’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानले.

         ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने दि.17 ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान ‘पलाश मिनी सरस’ भव्य प्रदर्शनीचे आयोजन इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आले होते.

 

         येथे लावलेल्या स्टॉल्स हे बचत गटाचे असून त्यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे केवळ पाच दिवसात तब्बल रुपये 82 लाखांची विक्री करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी व्यक्त केली.

         उमेद अंतर्गत कर्ज परतफेडीत गोंदिया जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. ग्रामीण उपजिविका बळकट करण्यासाठी स्वयंसहाय्यता बचतगट चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक धन्यवाद दिले.

         जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच दिवस चालणाऱ्या ‘पलाश मिनी सरस’च्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महिलांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी हा प्रयत्न केला गेला असल्याचे श्रीमती जाखलेकर यांनी सांगितले.

       यापुढे गोंदियातील कला राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अधिकाधिक पोचविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968