GADHCHIROLI जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असताना कागदी अहवालांची प्रतीक्षा कशासाठी? — रवींद्रभाऊ वासेकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर यांची आक्रमक मागणी
GADHCHIROLI : GADHCHIROLI जिल्ह्यातील शेतकरी आज मोठ्या संकटातून जात आहे. शेतीवर वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक रोगराई, नैसर्गिक संकटे आणि वन्यहत्तींच्या उपद्रवामुळे धोक्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोठे नुकसान होत आहे.

या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना कागदावर मोजू नका; बांधावर जाऊन परिस्थिती पाहा!

आज शेतकऱ्याच्या शेतात उभे असलेले पीक त्याच्या वर्षभराच्या कष्टाची कमाई आहे. रोगराईमुळे पिकांचे नुकसान होत असताना अनेक ठिकाणी वन्यहत्तींच्या कळपामुळे उभ्या धान पिकांची नासधूस होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला केवळ आश्वासन नको, तर तातडीचा शासन निर्णय आणि प्रत्यक्ष आर्थिक मदत हवी आहे.
राज्य शासनाने पीकनुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीवर भर देण्यात येत आहे.
मात्र गडचिरोलीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ अहवालांपुरता मर्यादित न ठेवता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी वासेकर यांनी केली आहे.
‘शेतकरी संकटात आणि सरकार निर्णयाच्या प्रतीक्षेत’ अशी परिस्थिती नको!
GADHCHIROLI जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज शासनाच्या मदतीची गरज आहे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे.
“शेतकऱ्याच्या घरातील चूल पेटली पाहिजे, त्याच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे आणि पुढील हंगामासाठी त्याच्या हातात पैसा राहिला पाहिजे,” या भूमिकेतून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी रवींद्रभाऊ वासेकर यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी
GADHCHIROLI जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे आवाज उठवत राहणार असल्याचे वासेकर यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठलीही राजकीय दिरंगाई नको, कागदी घोडे नकोत आणि केवळ आश्वासनांवर भागणार नाही. संकटग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत मिळणे हाच आमचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे प्रमुख मागण्या
१. GADHCHIROLI जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.
२. रोगराई व नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची तातडीने दखल घ्यावी.
३. बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी.
४. वन्यहत्तींकडून झालेल्या पीक नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी.
५. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीपासून दिलासा देऊन आवश्यकतेनुसार नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.
६. संकटग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आवश्यक मदत द्यावी.
७. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने बोनस जाहीर करावा.
“गडचिरोलीच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत आवाज थांबणार नाही!”
गडचिरोलीचा शेतकरी हा केवळ आकडेवारीतील आकडा नाही; तो जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कष्टाचा सन्मान झाला पाहिजे. संकटाच्या काळात सरकारने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
त्यामुळे गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.
“शेतकरी वाचला, तरच शेती वाचेल; शेती वाचली, तरच गडचिरोलीची ग्रामीण अर्थव्यवस्था वाचेल!”
————————–
GADHCHIROLI सबादाता आशिफ़ कुरेशी
