• Wed. Sep 16th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

अकोला शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील प्रणित) चा सरकारला इशारा – 10 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात चक्का जाम अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल

ByAshok Mishra

Sep 16, 2026

अकोला शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील प्रणित) चा सरकारला इशारा – 10 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात चक्का जाम
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला: अल निनो च्या प्रभावामुळे राज्यात पावसाने दडी मारली असून पिके करपून गेली आहेत, यामुळे सरकारने संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी केली आहे.
त्यांनी पत्रकाद्वारे खालील मागण्या केल्या आहेत:
अल-निनो च्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती असून कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
शेतकऱ्यांवर लादलेले अनैतिक स्मार्ट मीटर तात्काळ रद्द करावेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार सिमेंट रस्त्याची 100 वर्षे गॅरंटी आहे, त्यामुळे रंभापूर ते वाडेगव्हाण रस्ता रुंद करून प्रत्येक गावात गतिरोधक (स्पीड ब्रेकर) द्यावेत.
शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा (रानडुक्कर, नीलगाय) बंदोबस्त वन विभागाने करावा.

वरील मागण्या 10 दिवसात मान्य न झाल्यास गावोगावी जाऊन सभा घेऊन संपूर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

> लक्ष्मीकांत कौठकर
> विदर्भ अध्यक्ष,
> शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील प्रणित)

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */