०४ आरोपीसह सुगंधित तंबाखू मुद्देमाल, उत्पादन साहित्य व चारचाकी वाहन पोलीसांनी घेतले ताब्यात
एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्च पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ला देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) पोलीसांनी सुगंधित तंबाखूची अवैधपणे साठवणूक व उत्पादन करणाऱ्या आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक १८/०९/२०२६ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथील पोलीस पथकाला गोपनिय बातमिदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, इसम नामे अजीत कुजूर, रा. जांभळीझोरा, ता. थानोरा, जि, गडचिरोली हा आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखु बेकायदेशिर तयार करुन विक्री करीत आहे. सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) पोलीस पथकाने नमूद इसम नामे अजीत कुजूर यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन त्याच्या घराची व आजुबाजूच्या परिसराची पंचासमक्ष पाहणी घेतली असता, घरामध्ये एका चुंगळीमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंचाखुचा साठा केल्याचे आढळुन आले तसेच पॅकींग करीता लागणारे इतर साहित्य सुद्धा मिळून आले. त्यानंतर पोलीस पथकानी आजुबाजूच्या परिसराची पाहणी केली असता, घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाच्या मागच्या सिटच्या खाली दोन पिवळ्या व दोन पांढऱ्या रंगाच्या चुंगळीमध्ये सुगंधित तंबाखु मिळून आले. यावरुन सदर घरातून व वाहनातून १) सुगंधीत तंबाखु असलेल्या एकूण १०३ पांढऱ्या रंगाच्या चुंगळ्या एकूण किमत १२,०५,३८०/- रुपये, २) सुगंधीत तंबाखु ०२ पांढऱ्याा व ०२ पिवळ्या रंगाच्या चुंगळीत असलेले एकूण किंमत ३,०५,१००/०, ३) एका पिवळ्या रंगाच्या चुंगळीमध्ये मजा १०८ हुक्का शिसा तंबाखू असे लिहीलेले एकूण १० पॉलीथीनचे पॅकेट एकूण किंमत अंदाजे १३,२५०/- रुपये, ४) पॅकींग करीता लागणारे साहित्य ज्यामध्ये केकेपी लिहिलेले बैंक क्लोजर मशीन, ऑटोमॅटीक फिल्म सिलींग मशिन, पोटेंचल बॅग शिलाई मशिन, स्टरेटनर मशिन सर्व एकूण किमत अंदाजे
१,२५,५००/-, ५) एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन क्र. एम एच ३३ ए.सी. ५१७० जुने वापरती अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये असा एकूण २२,५०,२३०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. आरोपी नामे १) अजीत जोहन कुजूर याचेकडे सदर मुद्देमालायायत सखोल चौकशी केली असता त्याने घटनास्थव्यवरून फरार आरोपीचे नाव २) प्रशांत याडवार, रा. ता. व जि. गडचिरोली असे सांगितले व सर्व मुद्देमाल हा प्रशांत याङवार याचा असून त्यांच्या घरी हजर असलेले आरोपी ३) साईनाथ टाटाजी कन्नाके, ४) सचिन ज्ञानेश्वर कन्नाके दोघेही रा. ढोरप, ता. पचनी, जि. भंडारा तसेच ५) अभिजित यादव नान्हे रा. उमरेड जि. नागपूर हे त्याचे साथीदार असल्याचे त्यानी सांगितले.
________
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी
