• Mon. Sep 21st, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

जिंतूरमध्ये बंजारा समाजाचे ‘तिरडी’ आंदोलन; एसटी आरक्षणासाठी सरकारचे लक्ष वेधले

ByAshok Mishra

Sep 21, 2026

“विनोद आडे यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाने मागण्यांची तातडीने दखल घेण्याची मागणी”

महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी:- रमेश मुलगीर

जिंतूर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिंतूर येथे ५ सप्टेंबरपासून विनोद आडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने शनिवारी (दि. १९) दुपारी १ वाजता उपोषणस्थळी ‘तिरडी आंदोलन’ करण्यात आले.
‘सरकार दखल घेत नसल्यामुळे तिरडी आंदोलन’ अशी भूमिका घेत समाजबांधवांनी आंदोलनातून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजाने एकजुटीने लढा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
विनोद आडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यापूर्वी जिंतूरमध्ये रास्ता रोको आणि १६ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.
दरम्यान, बंजारा समाजाच्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन मागण्यांवर तातडीने चर्चा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बंजारा समाजाच्या आंदोलनाबाबत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968