• Thu. Sep 17th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

स्लग . . वर्धा जिल्हातील अल्लीपूर येथे ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न

ByAshok Mishra

Sep 17, 2026

अँकर . . वर्धा जिल्हाती अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे ‘श्रीगणेशा आरोग्याचा – आरोग्य अभियान 2026’ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली.
सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */