• Thu. Sep 17th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

कन्नड “कन्नड नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांच्या हस्ते ध्वजवंदन “

ByAshok Mishra

Sep 17, 2026

कन्नड

“कन्नड नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांच्या हस्ते ध्वजवंदन ”

कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

आज 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ति दिनानिमित्त नगराध्यक्षा फरीन बेगम यांच्या उपस्थितीत ध्वज फडकविण्यात आला यावेळी शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा संग्राम नुसता भूमि साठी नव्हता तर मराठवाड्याच्या अस्मितेसाठी जनतेने हुकुमशाही विरुद्ध लढलेला, लढा होता. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, तद्नंतर तब्बल 13 महिने 2 दिवस मराठवाडय़ातील जनतेला वाट पहावी लागली, निजामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी तेव्हा कुठे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला.
स्वतंत्र. झालेल्या भारत सरकारने हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचा आदेश दिला, त्याला ऑपरेशन ” पोलो ” असे नाव देण्यात आले आणि या लढ्यातून 17 सप्टेंबर 1948 रोजी माघार घेतली तोच दिवस मराठवाडा मुक्ति संग्राम म्हणुन ओळखला जातो.
हैदराबाद मुक्ति संग्राम यशस्वी करून मराठवाडय़ातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटी विरुद्धच्या या लढ्यात विजय संपादन केला.
1938 ते 1948 हा कालखंड मराठवाडा मुक्ति संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणुन ओळखला जातो.
यावेळी,मुख्याधिकारी महिला अधिकारी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ, नगरसेवक सुनील पवार, राजेंद्र चव्हाण, आणि अनेक नागरिक उपस्थित होते.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */