• Thu. Sep 17th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

कन्नड “कन्नड शहर पोलीससांची मटकाकिंग विरोधात मोठी कारवाई ” कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

ByAshok Mishra

Sep 17, 2026

कन्नड येथील सिद्दीक चौक परिसरात असलेली ग्रीन हॉटेल समोरील एका दुकानात कल्याण, श्रीदेवी, मिलन नावाचा मटका सुरू आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता.
ही माहिती आपले वरिष्ठ अधिकारी प्रभारी पोलीस उपअधीक्षक आरती पवार मॅडम यांना दिली असता क्षणाचा ही विलंब न करता त्यांनी पी. एस. आय. नवनाथ गाडेकर, पोलीस हवालदार श्री कुकलारे,पोलीस अमलदार श्री नरवडे यांनी दोन पंचासह वरील ठिकाणी छापा टाकला असता एक इसम आसिफ अहमद शेख राहणार बडा बंगला कन्नड हा कल्याण नावाचा जुगार मटका लिहीत असल्याचे आढळून आले, त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्या कडे 2230 रुपये आणि जुगार मटका लिहिण्याचे साहित्य आढळून आले.
हा सर्व मुद्देमाल आणि साहित्य आणि पकडलेला आरोपी यांना कन्नड शहर येथे आणण्यात आले, काल दिनांक 16/9/2026 रोजी टाकलेल्या या धाडीत रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती, पुढील तपास प्रभारी पोलीस उपअधीक्षक आरती पवार मॅडम यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार श्री. बागूल करीत आहे. कन्नड शहर पोलीस ठाण्यात अपराध रजिस्टर क्रमांक 268/26 कलम 13-A महाराष्ट्र जुगार बंदी नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */