• Thu. Sep 17th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

नांदेड /हदगाव अतुल राऊतराव उपोषणाची दखल; स्मशानभूमीच्या जागेचा पंचनामा

ByAshok Mishra

Sep 17, 2026

हदगाव तालुक्यातील पिंगळी येथील हिंदू स्मशानभूमीच्या जागेची सातबारा उताऱ्यावर अधिकृत नोंद करावी, या मागणीसाठी यादवराव चव्हाण आणि अशोक मुकटे यांनी हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

प्रशासनाने तातडीने दखल घेत मंडळ अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जागेचा पंचनामा केला.

सदर जागेचा अनेक वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी वापर होत असून, अधिकृत नोंद नसल्याने अतिक्रमणाचा धोका असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना माजी तालुकाप्रमुख पांडुरंग कोल्हे यांनी प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये समन्वय साधला.

पंचनामा व प्रशासनाच्या कार्यवाहीची दखल घेत उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. आता स्मशानभूमीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या पुढील प्रशासकीय कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */