हदगाव तालुक्यातील गोजेगावजवळ नागपूर–नांदेड महामार्गावर दि. १९ रोजी संध्याकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी सुभाष धोंडिबा टिळक यांचा मृत्यू झाला. यानंतर आज ग्रामस्थांनी बंद पथदिवे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तीन तास रास्ता रोको केला.
व्हॉइस ओव्हर :
सुभाष टिळक हे उमरखेडहून गोजेगावकडे परतत असताना प्रवासी निवाऱ्याजवळ उतरून महामार्ग ओलांडून जात असतानाच अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक पसार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
बंद पथदिवे सुरू करावेत, गतिरोधक बसवावेत आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
