• Mon. Aug 17th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

शैक्षणिक कार्याची दखल; राजेश ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’

ByRAJESH DHOKE

Aug 17, 2026

ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सालवा येथे सत्कार

सालवा, ता. मौदा : ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सालवा,येथे ज्येष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश ढोके यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

या गौरवाबद्दल ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सालवा,यांच्या वतीने श्री .राजेश ढोके यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य राजेश मोटघरे,पर्यवेक्षक श्री. एस. आर. पेंडाम तथा समस्त शिक्षकवृंद यांनी राजेश ढोके यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राजेश ढोके हे विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत पुरस्कार जाहीर झाल्याने विद्यालयाच्या शैक्षणिक परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी विद्यालयातील वर्ग 5 ते 12 वीचे सर्व विद्यार्थी,शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजेश ढोके यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.