अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला: जिल्हा न्यायालयासमोर आज एका मिनी पॅसेंजर वाहनातून अचानक धूर येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. वाहनात प्रवासी बसलेले होते.
त्याचवेळी तेथे बंदोबस्तावर असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत वाहन थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले आणि तांत्रिक बिघाडाची पाहणी केली.
त्यांच्या या वेळीच केलेल्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला असून नागरिकांनी विलास पाटील यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.
