कन्नड
“शाम कनगरे 16 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार ”
कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
कन्नड नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था ची कपात 1140034 रुपये केलेली बाकी येण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शाम कनगरे यांनी सतत पाठपुरावा केला सर्व कागदपत्रे जमा करून नगर परिषदे कडे जमा केले, बँकेतून स्टेटमेंट सुद्धा काढले.
ते आस्थापना विभागाचे श्री प्रशांत देशपांडे, आणि हिशोब विभागातील श्रीमती अलका दौड मॅडम यांच्या समक्ष ठेऊन त्यांनी हिशोब तपासला असता कवडीचे सुद्धा तफावत आढळून आली नाही.
या साठी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री शाम कनगरे हे 1/8/2026 रोजी सरणावर उपोषणाला बसले होते. परंतु नगर परिषद कन्नड येथील आस्थापना विभागाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर. उपोषण मागे घेण्यात आले .
जिल्हा सहकारी बँकेच्या स्टेटमेंट आणावेत मग आम्ही हिशोब जुळतो का हे पाहून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. मग यावर विचार केला जाईल असे सांगितले. नगर परिषद कन्नड कडून येणारी पतसंस्थेचे बाकी 1140034 .देण्यात येईल असे आश्वासन दिले होते पण आज महिना उलटून झाला तरी काही ही शहा निशा झाली नाही.
करिता संस्थेचे चेअरमन या नात्याने मी श्री शाम कनगरे यांनी दिनांक 16/9/2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय छ.संभाजीनगर येथे आमरण उपोषण करणार आहे अशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद कन्नड, पोलीस अधीक्षक ग्रामीण व शहरी कार्यालय छ.संभाजीनगर यांना दिले आहे.
