अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर ब्यूरोचीफ चाणक्य न्यूज़
अकोला: जुन्या शहर पोलीस स्टेशन हद्दीत आज एकाच समुदायाच्या दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर जोरदार दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत ३ ते ४ दुचाकींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून दोन्ही गट आमने-सामने आले आणि काही वेळातच दगडफेक सुरू झाली. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख नितीन लेव्हरकर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त आणि आरसीपी पथक तैनात करण्यात आले आहे.
सध्या परिसरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या दगडफेकीत कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पोलिसांचे आवाहन:
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
